नवी मुंबईत १६ व १७ मार्च रोजी ‘बाल मराठी संमेलन’चे भव्य आयोजन

 नवी मुंबईत १६ व १७ मार्च रोजी ‘बाल मराठी संमेलन’चे भव्य आयोजन

मुंबई, दि.१४ : ‘बाल मराठी संमेलन’ येत्या १६ व १७ मार्च २०२६ रोजी नवी मुंबई येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्याचे वने मंत्री गणेश नाईक यांच्या संयोजनाखाली आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यातून साकार होत असलेले हे संमेलन नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्र (साने गुरुजी बालनगरी) येथे आयोजित करण्यात आले आहे.

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीची गोडी लहानपणापासून मुलांमध्ये निर्माण व्हावी, त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे आणि मराठी भाषेचे संस्कार पुढील पिढीत रुजावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या भव्य संमेलनासाठी ‘स्व. दि. बा. पाटील मुख्यमंच’ आणि ‘डॉ. जयंत नारळीकर उपमंच’ असे दोन स्वतंत्र मंच उभारण्यात आले असून, दोन्ही मंचांवर मुलांसाठी विविध सांस्कृतिक, साहित्यिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार, दि. १६ मार्च, २०२६ रोजी सकाळी ८:३० ते ११:०० छ. शिवाजी महाराज चौक ते सिडको प्रदर्शन केंद्र अशी शोभायात्रा निघणार नसून त्यानंतर दु. १२ वाजता संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार, वने मंत्री गणेश नाईक, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, महापौर सुजाता पाटील आदी मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

सोमवार, दि. १६ मार्च, २०२६ रोजी होणारे कार्यक्रम
दि. बा. पाटील मुख्य मंच
दु.११.०० ते १२.०० बालनाट्य: लिझल’स सिक्रेट
दु. १२.०० ते १.०० उद्घाटन समारंभ
दु. १.०० ते २.४५ बालसाहित्य आविष्कार
दु. ३.०० ते ४.३० परिसंवाद : बालक – पालक मानसिकता- सहभाग अच्युत पालव (सुलेखनकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित), डॉ. सदानंद मोरे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ), प्रा. मिलिंद जोशी (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ), ॲड. नीलम शिर्के – सामंत (अध्यक्ष, बालरंगभूमी परिषद, महाराष्ट्र), मीना नाईक (ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका), संध्या देवरुखकर (राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार)
दुपारी ४.४५ ते ६.३० नाटक : माकडचाळे
सायं. ७.०० ते ९.०० अग्गोबाई – ढग्गोबाई (सलील कुलकर्णी (गीतकार) व संदीप खरे (कवी))
डॉ. जयंत नारळीकर उपमंच
दु.२.१५ ते ३.०० परिसंवाद : बोलीभाषा आणि बालक- सहभाग डॉ. रवींद्र शोभणे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ), अपूर्वा झोळगीकर, छ. संभाजीनगर (सृजनशील लेखनासाठी भारत सरकारचा बालश्री पुरस्कार), ऋषीकेश खिलारे, अमरावती (आदिवासींच्या बोलींचे अभ्यासक), आनंद बोंद्रे, रत्नागिरी (संगमेश्वरी बोली), दिगंबर नाईक, मुंबई (मालवणी बोली)
दु.३.१५ ते ४.१५ परिसंवाद : बालकांचा कला विश्वातील सहभाग, संवादक – बाळकृष्ण ओडेकर, गोविंद गोडबोले, मिरज (ज्येष्ठ रंगकर्मी), अरुण पटवर्धन, पुणे (बालनाट्य लेखक आणि दिग्दर्शक), संजय हळदीकर (ज्येष्ठ बालनाट्य प्रशिक्षक आणि परीक्षक), राधिका देशपांडे, पुणे (महा बालनाट्य दिग्दर्शिका), प्रकाश पारखी, राजीव तुलालवार, मुंबई, (व्यावसायिक बालनाट्य निर्माता व दिग्दर्शक), वृषांक कवठेकर, डोंबिवली, (राज्य बालनाट्य सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक)

मंगळवार, दि. १७ मार्च, २०२६ रोजीचे कार्यक्रम:
दि. बा. पाटील मुख्य मंच
स. ८.०० ते ९.०० बाल वारकरी – अभंग – टाळ मृदंग वादन, अक्षय महाराज भोसले, आळंदी
स. ९.०० ते १०.३० परिसंवाद : संत साहित्य आणि बालसंस्कार, संवादक : अक्षय महाराज भोसले, योगी निरंजन महाराज (अध्यक्ष, श्री ज्ञानेश्वर देवस्थान, आळंदी), डॉ. भावार्थ देखणे (विश्वस्त, श्री ज्ञानेश्वर देवस्थान, आळंदी), माणिक महाराज मोरे (संत तुकाराम महाराज संस्थान देहू), अक्षदा तनपुरे, आळंदी (प्रसिद्ध बालकीर्तनकार)
स. १०.४५ ते १२.१५ परिसंवाद : क्रीडाक्षेत्र, सहभाग : सुनंदन लेले, पुणे, (क्रीडा समीक्षक, पत्रकार), विजय साळवी, मुंबई, (क्रीडा समीक्षक, पत्रकार), सुहास खामकर, नवी मुंबई (शरीरसौष्ठवातील भारतश्री किताब), पूर्वा किनरे, रत्नागिरी, (आंतरराष्ट्रीय योग खेळाडू, श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेती),
दु. १२.३० ते २.०० कवी संमेलन : बालकवी सहभाग – प्रवीण दवणे, ठाणे (जेष्ठ कवी), कल्पना दुधाळ, दौंड (कवयित्री), संगीता बर्वे, पुणे (साहित्य अकादमी पुरस्कार), रमेश तांबे, लातूर (बालसाहित्यिक, अमर हिंद मंडळ, दादर), डॉ. दासू वैद्य, छ. संभाजीनगर (जेष्ठ बालकवी, गीतकार), प्रसाद माळी, नवी मुंबई (बालकवी), मिरा निमगांवकर, पुणे (बालकवी), प्रबोधिनी पठाडे, अहिल्यानगर (बालकवी), श्रीकांत ढोबळे, शिरूर (बालकवी), निलाक्षी जानवे, कल्याण (बालकवी), कामाक्षी सोनवणे, नाशिक (बालकवी).
दु. २.१५ ते ३.३० कृष्णकथा- शाहबाज गोलंदाज
सायं. ३.४५ ते ४.४५ परिसंवाद : मुलींची सुरक्षितता – संवादक : संजय भुस्कूटे, मिलिंद भारंबे (पोलिस आयुक्त, नवी मुंबई), तेजस्वी सातपुते (समादेशक, राज्य राखीव पोलीस दल, पुणे), अॅड. पद्मनाभ पिसे (ज्येष्ठ विधीज्ञ, उच्च न्यायालय, मुंबई), नीता फडके (निवृत्त पोलिस अधिकारी), डॉ. पौर्णिमा सुर्वे (प्राचार्या, शिवाजीराव एस. जोंधळे इन्स्टिट्यूट ऑफ लॉ अँड रिसर्च)
सायं. ५.०० ते ७.०० सांगता समारंभ व विशेष सन्मान सोहळा, विशेष समानार्थी : स्वप्निल जोशी (प्रसिद्ध सिने अभिनेते), आयुष म्हात्रे (प्रसिद्ध क्रिकेटपटू), विशेष पुरस्कार : श्रीनिवास पोकळे, भार्गव जगताप, त्रिषा ठोसर (नाळ -२ सिनेमा फेम : सर्वोत्कृष्ट बालकलाकार राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त), विशेष सन्मान आणि सादरीकरण : मायरा वायकुळ (तुझी माझी रेशीमगाठ फेम बाल कलाकार), किया इंगळे (बाल अभिनेत्री आणि समाज माध्यम प्रभावक), ईशानी पाटणकर (सूर नवा ध्यास नवा फेम गायिका)
पसायदान : शमीमा अख्तर (सरहद संस्थेची काश्मिरी विद्यार्थिनी) संदर्भ : संजय नहार
सायं. ७.१५ ते ९.३० नाटक : अलबत्त्या गलबत्त्या संदर्भ : राहुल भंडारी

 दि.१७ मार्च २०२६ डॉ. जयंत नारळीकर उपमंच

स. १०.०० ते ११.०० जोकर आणि जादूगार
स. ११.१५ ते १२.३० परिसंवाद : मराठी भाषेतील बालसाहित्य – संवादक : किरण केंद्रे (कार्यकारी संपादक, ‘किशोर’ मासिक, बालभारती), एकनाथ आव्हाड, मुंबई, (बाल साहित्य अकादमी पुरस्कार), डॉ. माधुरी सहस्रबुद्धे, पुणे (संचालिका, बालरंजन केंद्र, पुणे), नीता पाटील (संचालिका, जवाहर बालभवन, मुंबई), डॉ. सतीश साळुंके, बीड (लेखक, नाट्यकर्मी), अशोक गाडेकर, मुंबई (संचालक, ग्रंथालय संचालनालय)
दु. १२.४५ ते २.०० परिसंवाद : मराठी माध्यमाच्या शाळांचे भवितव्य आणि पालकांची मानसिकता- सहभाग दत्तात्रय वारे, पुणे (जगातील सर्वोत्तम शाळा पुरस्कार), अश्विनी लाठकर, छ. संभाजीनगर (उपक्रमशील शिक्षणाधिकारी), नामदेव माळी, सांगली (उपक्रमशील शिक्षक), नागसेन पेंढारकर, नंदुरबार (आदिवासी भागातील कृतिशील शिक्षक)
दु. २.१५ ते ३.१५ नाट्यप्रयोग : ‘अभया’ संदर्भ : मीना नाईक, मुंबई (ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका)
दु. ३.३० ते ४.३० परिसंवाद : बदलत्या युगातील तंत्रज्ञान आणि बालमानसशास्त्र- सहभाग डॉ. राजीव तांबे
संवादक : प्रा.अनुजा ब्रह्मे, ओमप्रकाश झुरले, लातूर (प्रयोगशील शाळेचे संकल्पक)
मराठी बालसाहित्य आणि साहित्यिकांच्या प्रतिभेला भव्य व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या या अनोख्या आणि ऐतिहासिक उपक्रमात नागरिकांनी, विशेषतः विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर सुजाता पाटील यांनी केले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *