जागतिक महिला दिन मनाला स्पर्श करणारा उपक्रम ठरला

 जागतिक महिला दिन मनाला स्पर्श करणारा उपक्रम ठरला

टिटवाळा, दि १३: ८ मार्च रोजी स्वराज्य शिवशक्ती महिला मंडळ, टिटवाळा व स्वराज्य कोकण प्रतिष्ठान (रजि.) (ता. कल्याण) यांच्या वतीने जागतिक महिला दिन अत्यंत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
या निमित्ताने बेघर माऊली निवारा केंद्र, टिटवाळा येथे जाऊन तेथील आपल्या वृद्ध माऊलींना सन्मानाचा फेटा, साडी व खणानारळाने ओटी भरून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या समवेत स्नेहभोजन करून प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचा खरा सण साजरा करण्यात आला. ज्यांनी आयुष्यभर कुटुंबासाठी संघर्ष केला, त्याच माऊली आज आयुष्याच्या संध्याकाळी एकट्या पडल्या आहेत. अशा मातांच्या चेहऱ्यावर हसू आणणे आणि त्यांना मायेची ऊब देणे हाच खरा महिला दिनाचा अर्थ आहे, याची जाणीव या उपक्रमातून झाली.
या प्रसंगी प्रभाग क्रमांक ४ च्या सेवेस सदैव तत्पर असणाऱ्या नगरसेविका नमिता मयूर पाटील, स्वराज्य शिवशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा निधी मालप, सर्व महिला शिलेदार तसेच स्वराज्य कोकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदिप घाणेकर, प्रसाद फर्डे सर व सर्व शिलेदार उपस्थित होते.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *