विद्यार्थिनी शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीसाठी आता वित्तीय संस्थांचा सहभाग
मुंबई दि १३ : महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक शुल्क शासनाकडून प्रतिपूर्ती होण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी आता वित्तीय संस्थांशी करार करण्यात येणार आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली.
याबाबतचा मूळ प्रश्न रईस शेख यांनी उपस्थित केला होता त्यावर कैलास पाटील, सुधीर मुनगंटीवार, यांनी उपप्रश्न विचारले. हे शुल्क सर्व संबंधित महाविद्यालयाला सरकारने उशिरा दिल्यामुळे विद्यार्थीनींकडून आधीच हे शुल्क आकारले जाते हे टाळण्यासाठी वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरूपात ते उपलब्ध करून ती रक्कम सरकार त्यांना देईल अशी माहिती देखील मंत्री पाटील यांनी दिली.
ही योजना सुरू झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या ४१ टक्क्यांनी वाढली आहे, प्रवेश अर्जांबाबत असलेल्या अनेक अडचणी सोडवल्या आहेत, ही प्रक्रिया अधिक सुटसुटीत करण्यात आली आहे ती या वर्षी लागू करण्यात येईल असं ही मंत्र्यांनी सांगितलं. ही योजना लागू न करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर त्वरित कारवाई करण्यात येईल असं ते यावेळी म्हणाले.ML/ML/MS