पुण्यातील अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहार बंद

 पुण्यातील अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहार बंद

पुणे, दि. १२ : राज्यात निर्माण झालेल्या LPG गॅस टंचाईची झळ आता शालेय विद्यार्थ्यांनाही बसू लागली आहे. शालेय पोषण आहार योजना आता अडचणीत आली आहे. पुणे जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये शालेय पोषण आहार योजनाही महिला बचत गटांमार्फत राबवली जाते. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. मात्र पोषण आहार बनवण्यासाठी आवश्यक असलेला कमर्शियल गॅस उपलब्ध होत नसल्याने या महिला सध्या चिंतेत आहेत.

ग्रामीण भागातील शाळांवरही दिसू लागला आहे. पुणे जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये शालेय पोषण आहार योजना ही महिला बचत गटांमार्फत राबवली जाते. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. मात्र पोषण आहार बनवण्यासाठी आवश्यक असलेला कमर्शियल गॅस उपलब्ध होत नसल्याने या महिला सध्या चिंतेत आहेत.यापूर्वी सुमारे 1350 रुपयांना मिळणारा कमर्शियल गॅस आता सुमारे 1850 रुपयांपर्यंत पोहोचल्याचे महिला बचत गटांचे म्हणणे आहे.गॅसच्या दरवाढीसोबतच सध्या सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने शालेय पोषण आहार वेळेवर तयार करणे कठीण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक महिला बचत गटांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना तसेच गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देत परिस्थितीची माहिती दिली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *