बेस्ट बसचे दुपट्टभाडे कमी करणार
बेस्ट समिती सदस्य उपेंद्र सावंत

 बेस्ट बसचे दुपट्टभाडे कमी करणारबेस्ट समिती सदस्य उपेंद्र सावंत

मुंबई, दि १२: ग्राहक पंचायत महाराष्ट्र मुंबई उपनगर कुर्ला तालुक्याचे अध्यक्ष संजय येवले व सचिव ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे यांनी विक्रोळी कन्नमवार नगरचे माजी नगरसेवक व बेस्ट समितीचे सदस्य उपेंद्र सावंत यांना बेस्ट बसने केलेल्या अन्यायकारक दुप्पट तिकीट भाडेवाढी संदर्भात तक्रार पत्र दिले.सध्या बेस्टच्या बहुतांश बसेस इलेक्ट्रिक वर चालत आहेत.एका किलोमीटर साठी कमी इंधन लागत असल्याने केलेली दुपट्ट वाढ ही पूर्णता अयोग्य आहे,यात ग्राहकांचा तोटा आहे. त्याचप्रमाणे एक किलोमीटर साठी शेअर रिक्षा दहा रुपये भाडे घेत असताना बेस्टचे तिकीट 12 रुपये आहे. त्यामुळे अनेक बेस्ट प्रवासी बेस्ट बसणे प्रवास न करता रिक्षाने प्रवास करत आहेत. त्यामुळे कमी अंतरासाठी बेस्ट बसच्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. ग्राहकांचा विचार करता केलेली दुपट्ट भाडे वाढ कमी करावी जेणेकरुन ग्राहकांना त्याचा जास्तीत जास्त लाभ होईल आणि बेस्टचे प्रवासी आणखी वाढतीलअसे पत्रात म्हटले आहे.बेस्ट ही एक सार्वजनिक सेवा आहे.ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालविणे आवश्यक असून ती सर्वसामान्य ग्राहकांसाठी परवडणारी तसेच उपयुक्त आहे असे पत्रात म्हटले आहे.
बेस्ट बस सेवा ही लोकांसाठी असून ती नफा ना तोटा या उद्देशाने चालू असते. बेस्ट प्रशासनाने केलेली दुप्पट ही अन्यायकारक असून मी नक्कीच भाडेवाढ कमी करेन असे आश्वासन बेस्ट समिती सदस्य उपेंद्र सावंत यांनी दिले.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *