हवामान विभागाकडून उष्णतेचा अलर्ट जारी
मुंबई, दि. ७ : पुढील काही दिवस महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात उष्णता वाढली आहे. 9 मार्च रोजी कोकणात आणि 9 आणि 10 मार्च रोजी गुजरातच्या किनारी भागात तीव्र उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. तसेच 7 आणि 8 मार्च रोजी दक्षिण आणि मध्य किनारी आंध्र प्रदेश आणि लगतच्या रायलसीमा आणि उत्तर तामिळनाडू जिल्ह्यांच्या अनेक भागातही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक भागात उष्णता वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर भारतातील हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम राजस्थानमध्ये तापमान सामान्यपेक्षा 3-7 अंश सेल्सिअस जास्त नोंदवण्यात आले आहे. उत्तराखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, गुजरात, कोकण आणि गोवा येथे सामान्यपेक्षा 2-5 अंश सेल्सिअस जास्त तापमान नोंदवण्यात आले आहे. आगामी काळात या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
SL/ML/SL