राज्य सरकार देणार निवृत्त अग्निविरांसाठी रोजगाराच्या संधी ….
मुंबई दि ६ : राज्यातून अकरा हजार तरुण देशाच्या सैन्यदलात अग्निविरांच्या रूपाने निवडले गेले आहेत त्यातील पंचवीस टक्के चार वर्षानंतर केंद्र सरकारच्या विविध विभागात सामावून घेतले जातील उर्वरित तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता एक अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे, त्याचा अहवाल पुढील महिन्यात आल्यावर त्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
याबाबतचा प्रश्न चंद्रदीप नरके यांनी उपस्थित केला होता त्यावर नितीन राऊत यांनी उपप्रश्न विचारला. चार वर्षांनी निवृत्त होणाऱ्या ७५ टक्के तरुणांना रोजगार उपलब्ध द्यावा अशी मागणी या सदस्यांनी केली. यासाठी निवृत्त वरिष्ठ सैनिकी अधिकाऱ्यांचा अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे त्याचा अहवाल पुढील महिन्यात येईल , त्यानंतर राज्यातील विविध विभागातील गणवेष असणाऱ्या दलांमध्ये त्यांना सामावून घेता येते का याची चाचपणी संबंधित विभागांच्या मंत्र्यांशी करून मग मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती देखील मंत्री देसाई यांनी दिली.ML/ML/MS