Apple ने लाँच केला सर्वात स्वस्त लॅपटॉप मॅकबुक

 Apple ने लाँच केला सर्वात स्वस्त लॅपटॉप मॅकबुक

मुंबई, दि. ५ : Apple ने आपला आतापर्यंतचा सर्वात परवडणारा लॅपटॉप ‘मॅकबुक निओ’ Macbook neo लॉन्च केला आहे. कंपनीने हा अशा युजर्ससाठी सादर केला आहे ज्यांना कमी बजेटमध्ये मॅकबुकचा अनुभव घ्यायचा आहे. याची सुरुवातीची किंमत भारतात 69,990 रुपये ठेवण्यात आली आहे. मॅकबुक निओला एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 16 तासांपर्यंतचा व्हिडिओ प्लेबॅक टाइम मिळतो. हे नवीनतम macOS वर काम करेल. व्हिडिओ कॉलसाठी यात 1080p फेसटाइम HD कॅमेरा आणि स्पेशल ऑडिओ सपोर्ट असलेले ड्युअल स्पीकर दिले आहेत.

Macbook neoमध्ये A18 प्रो चिपसेट देण्यात आला आहे. हा 6-कोर CPU आणि 5-कोर GPU सह येतो. यात 16-कोर न्यूरल इंजिन (NPU) देखील आहे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टास्क जलद प्रोसेस करते. ही चिप आयफोन 16 प्रोमध्ये मिळत होती.

ॲपलचा दावा आहे की स्मार्टफोन चिपसेट असूनही, हा लॅपटॉप ब्राउझिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग, फोटो एडिटिंग आणि दैनंदिन ऑफिसचे काम मोठ्या सहजतेने हाताळू शकतो.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *