ताडदेव येथे भव्य गडकिल्ले स्पर्धा आणि प्रदर्शन सोहळा

 ताडदेव येथे भव्य गडकिल्ले स्पर्धा आणि प्रदर्शन सोहळा

मुंबई, दि ५
श्री सह्याद्री प्रतिष्ठान व ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (ताडदेवचा राजा) यांच्या संयुक्त विद्यमाने ताडदेव येथील गोकुळधाम सोसायटी येथील पटांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भव्य गड किल्ले स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम ६ मार्च ते ७ मार्च रोजी सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत प्रदर्शनासाठी सर्वांना उपलब्ध राहणार आहे. या कार्यक्रमात वेग वेगळया क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ जयदीप मिराशि यांच्या हस्ते होणार आहे. विभागातील नागरिकांना शिवकालीन गड किल्ल्यांची माहिती व्हावी आणि शिवरायांचा इतिहास युवा पिढीला समजावा या उद्देशाने या शिवकालीन गड किल्ल्यांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास विभागातील शाळा व महाविद्यालय आणि शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवहान कार्यक्रमाचे आयोजक, अध्यक्ष सिद्धेश माणगावकर यांनी केले आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *