पोषक हवामानामुळे गव्हाचे पीक जोमात बहरले. भरघोस उत्पन्नाची अपेक्षा…
जालना दि ५ : जालन्यात पोषक हवामानामुळे गव्हाचे पीक जोमात बहरले आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना गव्हाचे भरघोस उत्पादन व चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. रब्बी हंगामात निसर्गाची साथ आणि कडाक्याच्या थंडीमुळे गव्हाचे पीक चांगले जोमात आले आहे. सध्या गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असून, शेतात डोलणाऱ्या हिरव्यागार पिकाकडे पाहून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यंदा डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे गव्हाच्या फुटव्यांची संख्या वाढली असून ओंब्यांची लांबीही लक्षणीय आहे. त्यामुळे यंदा गव्हाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.ML/ML/MS