४८ वर्षांनंतर पुरीच्या जगन्नाथाच्या रत्न भंडाराची होणार मोजदाद

 ४८ वर्षांनंतर पुरीच्या जगन्नाथाच्या रत्न भंडाराची होणार मोजदाद

पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या रत्न भंडाराची मोजदाद आणि यादी बनवण्यासाठी प्रक्रिया अखेर लवकरच सुरू होणार आहे. रत्न भंडार’ हे भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा यांच्या मौल्यवान आभूषणांचा प्राचिन खजिना आहे. हे मंदिर जगमोहन (सभा कक्ष) उत्तर दिशेला आहे. 1978 मध्ये झालेल्या गणतीनुसार, येथे 128.38 किलोग्राम सोने आणि 221.53 किलोग्राम चांदीची आभूषणे आहेत. त्यानंतर आता ओडिशा सरकारने चैत्र शुक्ल सप्तमीला (25 मार्च, बुधवार) दुपारी 12:12 पासून ते 1:45 पर्यंतचा शुभ मुहूर्त त्यासाठी निश्चित केला आहे. यापूर्वी 1978 मध्ये रत्न भंडारातील आभूषणांची गणती झाली होती. ती तब्बल 72 दिवस चालली होती.

या संपूर्ण प्रक्रियेचे छायाचित्रण तसेच व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत सहमती दर्शवण्यात आली आहे. तर राष्ट्रीयीकृत बँकेचे नोंदणीकृत सराफही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

दागिन्यांच्या गणतीसाठी राज्य सरकारने मार्गदर्शक प्रणाली जारी केली आहे. तीन सदस्यीय समिती प्रक्रियेची पूर्णपणे निगराणी करेल. सोने, चांदी आणि इतर किमती आभूषणांसाठी वेगवेगळे बॉक्स असतील. 10 जण आभूषणे बॉक्समध्ये सुरक्षित ठेवतील. दंडाधिकारी खजिन्यातून रोज रत्न भंडाराची चावी घेऊन येतील. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याच दिवशी ती जमा केली जाईल.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *