15 लाख युजर्सनी 48 तासांत सोडले ChatGPT

 15 लाख युजर्सनी 48 तासांत सोडले ChatGPT

मुंबई, दि. ४ : OpenAI चे सॅम ऑल्टमॅन यांना US डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स यांच्यासोबत केलेला करार त्यांना चांगलाच महागात पडला आहे. 48 तासांपेक्षा कमी कालावधीत 1.5 मिलियन (सुमारे 15 लाख) सदस्यांनी OpenAI चे AI ChatGPT प्लॅटफॉर्म सोडले आहे. हे युजर्स अमेरिका आणि OpenAI यामधील कराराला विरोधत करत आहेत. OpenAI आणि US डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स यांच्यातील करारानुसार, कंपनी US डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सला वर्गीकृत सरकारी नेटवर्कवर AI मॉडेल्स वापरण्याची परवानगी देईल. त्यानंतर ChatGPT ला विरोध होऊ लागला आहे. या करारामुळे, अँथ्रोपिकच्या क्लाउडने OpenAI च्या ChatGPT ला मागे टाकत अ‍ॅप स्टोअर रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवले.

AI फर्म अँथ्रोपिकने अमेरिकन सरकारला कोणत्याही निर्बंधाशिवाय त्याचे मॉडेल वापरण्यास मनाई केल्यानंतर ही बातमी आली. अँथ्रोपिकच्या या निर्णयाला बऱ्याच युजर्सचा पाठिंबा मिळाला, जे आता ChatGPT सोडून अँथ्रोपिकच्या क्लॉड चॅटबॉटकडे जात आहेत.

OpenAI ने अलीकडेच पेंटागॉनबरोबर करार केला आहे. या अंतर्गत ती तिच्या AI तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षित प्रणालीमध्ये करणार आहे. या निर्णयावर ऑनलाइन खूप टीका होत आहे. काही युजर्सनी कंपनीवर लष्करी कारवाईला पाठिंबा दिल्याचा आरोपही केला आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *