काळाचौकी येथे खोदलेल्या रस्त्यामुळे अपघातात वाढ

 काळाचौकी येथे खोदलेल्या रस्त्यामुळे अपघातात वाढ

मुंबई, दि ४
काळाचौकी येथील टी.बी. कदम मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्त्याचे काम सुरू असून त्यामुळे अर्ध्या रस्ता हा खोदलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालकांना आपले वाहन चालवणे फार त्रासदायक झाले आहे. दुचाकीस्वारांना या रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी स्वरांचा मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहे. तरी या रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवासी दुकानदार वाहन चालक आणि पादचारी करत आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात आजूबाजूला हो इमारती आणि कॉलनी असल्याने याच महामार्गावरून पादचारी देखील ये जा करत आहेत. त्याचप्रमाणे या परिसरात म्हाडा कॉलनी जाण्यासाठी हाच रस्ता असल्याने त्यांना देखील या खोदलेल्या रस्त्याचा अर्थ सांगावा लागत आहे. तसेच या रस्त्याच्या समोरच चिंचपोकळी रेल्वे स्थानक असल्याने या ठिकाणी रेल्वे प्रवासी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. त्यांना देखील या खोदलेले रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या खाद्यला रस्त्याच्या बाजूला असलेला रस्ता हा पूर्णपणे ओबडधोबड झाला असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. तसेच कोणत्या दराने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी, माती आणि सिमेंट टाकल्यामुळे वाहन गेल्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूळ पसरते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक प्रकारच्या रोगांचा सामना करावा लागत आहे. तरी हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.
टीव्ही कदम मार्गावरील खोदलेले रस्त्याबाबत माझ्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाला आहेत. महापालिकेचे तंत्रज्ञानाने एक नियमित वेळ दिली आहे त्या वेळेला मंत्र दलाला हा रस्ता पूर्ण करावा लागतो नाहीतर महापालिका प्रशासन त्याच्याकडून दंड वसूल करते. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांचा झाला असता पूर्णपणे सिमेंट काँक्रीट चा होईल त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही. अशी माहिती शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी दिली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *