इराण महिला फुटबॉल संघाने राष्ट्रगीत गाण्यास दिला नकार

 इराण महिला फुटबॉल संघाने राष्ट्रगीत गाण्यास दिला नकार

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे इस्राईल आणि अमेरिका यांनी मिळून इराणवर केलेल्या हल्ल्यात मारले गेले. अयातुल्ला अली खामेनी यांच्या घरावर इस्राईल आणि अमेरिकेने जवळपास तीन बॉम्ब टाकले. इराणच्या महिला फुटबॉल संघाने हा सायलेंट प्रोटेस्ट इराणचे खामेनी यांच्या मृत्यूनंतर प्रोटोस्च केला आहे. सध्या एएफसी महिला आशिया कप 2026 ही (Asia Cup 2026) फुटबॉल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत रविवारी इराण आणि साऊथ कोरिया (Iran VS South Korea) यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यापूर्वी इराणच्या राष्ट्रीय महिला संघाने त्यांच्या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यापूर्वी सायलेंट प्रोटेस्ट केला. गोल्ड कोस्टच्या सीबस सुपर स्टेडियममध्ये सामन्यापूर्वी इराणचं राष्ट्रगीत वाजवलं गेलं होतं. मात्र यादरम्यान खेळाडू आणि इतर स्टाफने सामन्यापूर्वी देशाचं राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला.

इराण विरुद्ध दक्षिण कोरिया सामन्यापूर्वी खेळाडू राष्ट्रगीत गाण्यासाठी मैदानात आले. यावेळी जेव्हा इराणचं राष्ट्रगीत वाजवण्यात आलं तेव्हा इराणच्या कोणत्याही खेळाडू किंवा हेड कोच मरजियाह जाफरीने राष्ट्रगीत गायलं नाही. ते सर्व अगदी समोर पाहत होते. हा सायलेंट प्रोटेस्ट इराणचा सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांच्या इस्रायली आणि अमेरिकेच्या हल्ल्यात मारल्या गेल्याच्या घटनेच्या निषेधार्थ होता. रविवारी माध्यमांच्या प्रश्नांदरम्यान, इराणी कर्णधार झहरा घनबारी आणि जाफरी यांना खामेनी यांच्या मृत्यूबद्दल विचारण्यात आले, परंतु त्यांनी या प्रश्नांवर उत्तर देणं टाळलं. ईएसपीएननुसार जाफरीने फारसी भाषेत उत्तर दिलं होतं, मात्र एएफसी मीडिया प्रतिनिधिने कोणत्याही अनुवादाशिवाय जाफरीने दिलेलं उत्तराची क्लिप कापली.

इराणने आतापर्यंत एएफसी महिला आशिया कप 202 स्पर्धेत एकूण तीन सामने खेळले असून यात एक सामना हा ड्रॉ झाला तर दोन सामन्यात ते पराभूत झाले. याशिवाय 2026 मध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांना दक्षिण कोरिया विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *