लाल सेनेचा खेटर मोर्चा जल्लोषात

 लाल सेनेचा खेटर मोर्चा जल्लोषात

मुंबई, दि २५
लाल सेनेच्या वतीने आज आझाद मैदानावर खेटर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त करण्यात आला. अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला नाही तर या संतापाची धग महाराष्ट्रातील जिल्हा जिल्ह्यात आणि गावागावात पोहचू शकते. ज्या मातंग समाजाने भाजपा आणि महायुतीला मतदान केलं आहे त्यामुळे महायुतीला बहुमत मिळून माहिती सत्तेवर आली आहे. मातंग समाजाच्या आरक्षण वर्गीकरण संदर्भात सरकारने अजून पर्यंत कोणता निर्णय न घेता सतत केलेली आहे. परंतु आता या अधिवेशनामध्येच जर योग्य तो निर्णय न्याय झाला आणि पुन्हा चालढकल केली तर मातंग समाज येणाऱ्या निवडणुकीमध्ये ती सरकारला खाली खिचडी शिवाय राहणार नाही असा संकल्प करण्यात आला आहे. आंदोलकांनी हातात खेटर घेऊन सरकारच्या विरोधात घोषणा दिल्यामुळे पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता आणि आझाद मैदानावर बराच काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आता झालेल्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये मातंग समाजाने महायुती सरकारच्या पायऱ्यांमध्ये आपले बहुमूल्य मत देऊन या सरकारला विजयी केले होते. परंतु सरकारने दिलेल्या आश्वासन पाहिले नसून सरकार नेहमीप्रमाणे या अधिवेशनामध्ये देखील चालढकल करत आहे. परंतु आता लाल सेना गप्प बसणार नसून आपल्या हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच जोपर्यंत आरक्षण मध्ये करेन होत नाही तोपर्यंत आमचा हा मोर्चा असाच सुरू राहिला अशी माहिती लाल सेनेचे पदाधिकारी कॉम्रेड गणपत भिसे यांनी दिली. या मोर्चा मध्ये लाल सेनेचे पदाधिकारी जितेंद्र गायकवाड ,सचिन खैरनार,भुजंग कांबळे, एल डी कदम सारजाबाई भालेराव, कोंडीबा जाधव आणि असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *