चंद्रपुरात लोहखनिज खाणीसाठी वनविभागाची परवानगी नाहीच

 चंद्रपुरात लोहखनिज खाणीसाठी वनविभागाची परवानगी नाहीच

मुंबई दि २५ : चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी तालुक्यातील लोहारडोंगरी येथील वनविभागाची कोणतीही जागा लोहखनिज खाणीसाठी देण्यात आलेली नाही, कोणालाही वन विभागाने अद्याप मंजुरी दिलेली नाही असा खुलासा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत केला. याबाबतचा प्रश्न अस्लम शेख यांनी उपस्थित केला होता.

यावर नितीन राऊत, आदित्य ठाकरे यांनी उपप्रश्न विचारले. राज्य वन्यजीव मंडळाने या लोहखनिज प्रकल्पाला मान्यता दिलेली नाही, अशी कोणतीही शिफारस केंद्र सरकारकडे केलेली नाही. अशी मंजुरी देऊ नये यासाठी वनविभाग केंद्र सरकारकडे शिफारस करणार आहे आणि वन्यजीव मंडळाच्या त्रि सदस्यीय समितीला यावर सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे अशी माहिती देखील मंत्री नाईक यांनी दिली. याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावरील अंतिम निर्णय अपेक्षित आहे त्यात सखोल अभ्यास केला जाईलच असं ही मंत्र्यांनी स्पष्ट केलं.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *