पाण्यावर चालणाऱ्या कारचे झाले लोकार्पण…..

 पाण्यावर चालणाऱ्या कारचे झाले लोकार्पण…..

अलिबाग दि २३ – रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यांतील नागावमध्ये समुद्रात पाण्यावर चालणाऱ्या कारचे लोकार्पण उद्योजक निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते लोकार्पण काल करण्यात आले. यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, आमदार महेंद्र दळवी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

“सागरी किनारे, पर्यटन विकास तसेच पर्यटनावर आधारित रोजगार निर्माणासाठी राज्यसरकारचे सकारात्मक धोरण असल्याचे” निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने समुद्रात पाण्यावर चालणारी कार बोट लक्षवेधी ठरत आहे.

“वॉटर स्पोर्ट्स मुळे या विभागात मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढणार असून तिसरी मुंबईमध्ये अलिबागचे समावेशन असल्यामुळे व रेवस येथे होत असलेल्या जेटीमुळे नागाव येथे पर्यटकांना सुविधा मिळणार आहे. पुढील काही वर्षांत मुंबई पेक्षा मोठी व प्रगत ही तिसरी मुंबई असणार” असल्याचे यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले. नागरिकांना देखील कार बोटीचे आकर्षण असल्याचे दिसून आले.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *