ऑपरेशन सिंदूर’ मधील कामगिरीसाठी सोलापूरच्या सुपुत्राचा विशेष सन्मान

 ऑपरेशन सिंदूर’ मधील कामगिरीसाठी सोलापूरच्या सुपुत्राचा विशेष सन्मान

नवी दिल्ली,दि. २१ : काश्मीरमध्ये पहलगाम येथे पाकिस्तानने पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले होते. या ऑपरेशन अंतर्गत विशेष कामगिरी केल्याबद्दल सोलापूरचे सुपुत्र सुशील गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयातील ऑपरेशन आणि लॉजिस्टिक्स संचालनालयात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असताना बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुशील गायकवाडांना भारतीय लष्कर प्रमुखांचे प्रशंसा पदक (Indian Army Chief Commendation Medal) प्रदान करण्यात आले. नवी दिल्लीतील संरक्षण मंत्रालयात आयोजित विशेष सोहळ्यात त्यांना भारतीय लष्कर प्रमुखांचे प्रशंसा पदक देऊन गौरविण्यात आले. उपलष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

प्रशासनातील अनुभव, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व आणि साहित्यिक आवड यांचा संगम असलेले अधिकारी अशी ख्याती असलेले सुशील गायकवाड हे 1998 बॅचचे Indian Railway Traffic Service (IRTS) अधिकारी असून सध्या नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे गुंतवणूक निवासी आयुक्त (Resident Commissioner Investment) म्हणून कार्यरत आहेत.

संरक्षण मंत्रालयात सेवा बजावत असताना विशेषतः ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान गायकवाड यांनी ऑपरेशन आणि लॉजिस्टिक्स विभागात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. कठीण आणि संवेदनशील परिस्थितीत त्यांनी केलेले धोरणात्मक नियोजन आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थापन या मोहिमेसाठी निर्णायक ठरले.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *