आदिवासी कोळी समाजाचा आझाद मैदानावर मोर्चा

 आदिवासी कोळी समाजाचा आझाद मैदानावर मोर्चा

​मुंबई प्रतिनिधी. दि. २१ : महाराष्ट्रातील आदिवासी कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, टोकरे कोळी आणि कोळी ढोर या अनुसूचित जमातींच्या न्याय्य हक्कासाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित अनुसूचित जमाती संघर्ष समितीच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर ‘विराट मोर्चा’ आयोजित करण्यात आल्याची घोषणा दत्ता सुरवसे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन केली.

​समितीचे प्रमुख आयोजक दत्ताभाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून, यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो समाजबांधव सहभागी होण्याची शक्यता आहे. जाती प्रमाणपत्र आणि पडताळणी: अधिनियम २००० आणि नियम २००३ मधील तरतुदींनुसार अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात. सन १९५० पूर्वीच्या पुराव्यांच्या आधारे सुलभपणे प्रमाणपत्रे मिळावीत. अशी मागणी प्रमुख आयोजक दत्ताभाऊ सुरवसे यांनी केली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *