10 गुंठ्यांत सेंद्रीय वांगी लागवड -३.५ लाखांचा नफा

 10 गुंठ्यांत सेंद्रीय वांगी लागवड -३.५ लाखांचा नफा

सोलापूर, दि. २० : अल्पभूधारणा असूनही योग्य नियोजनातून पीक घेतल्यास उत्तम नफा मिळवू शकतो, हे सोलापूर येथील एका शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. मोहोळ तालुक्यातील कोरवली गावातील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी केवळ 10 गुंठ्यांमध्ये सेंद्रिय पद्धतीने वांग्याची लागवड करून केवळ आठ महिन्यात साडेतीन लाख रुपयांचा नफा मिळवणार आहेत.

15 डिसेंबरला सुरू केलेल्या या लागवडीसाठी 10 गुंठ्याना फक्त 20 हजार रुपयांचा खर्च आला. यात 800 वांग्याच्या रोपांची लागवड केली. पहिल्या तोडणीतच एक क्विंटल वांगा निघून 80 हजार रुपयांचा नफा मिळाला. आठ महिने चालणाऱ्या या तोडणीत एकूण खर्च वजा करून 3 ते 3.50 लाखांचा नफा अपेक्षित आहे. ज्ञानेश्वर बाजारऐवजी सोलापूर जिल्ह्यातील गावांतील आठवडी बाजारात विक्री करतात, ज्यामुळे दुप्पट नफा मिळतो. ज्ञानेश्वर म्हणाले, शिक्षण कमी असले तरी शेतीचे ज्ञान आणि मेहनत महत्त्वाची. त्यांच्या यशाने स्थानिक शेतकरी उत्साहित झाले असून, सेंद्रिय शेतीचा प्रसार होण्याची शक्यता आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *