नगरसेवक बनणार वेंडर
उभाटाच्या नगरसेवकांचा विरोध
मुंबई, दि २०
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुनिसिपल सेक्रेटरी डिपार्टमेंट करणं एक पत्र जाहीर करण्यात आले आहे. त्या पत्रामध्ये सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना सेप प्रणाली द्वारे वेंडर कोड रजिस्टर करण्याबाबत सुचित करण्यात आले. जर साप प्रणाली द्वारे आपण वंडर कोर्ट रजिस्टर नाही केला तर आपले मानधन आपल्याला मिळणार नाही अशी शक्ती करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या मुनिसिपल सेक्रेटरी डिपार्टमेंट करून करण्यात आलेल्या या सक्तीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी विरोध दर्शवला असून आम्ही हे सेप प्रणाली द्वारे वंडर कोर्ट रजिस्टर करणार नाही असे जाहीर केले आहे. तसे पत्र उबाटाच्या सर्व नगरसेवकांनी महापालिका आयुक्त आणि महापौर यांना दिले आहे.
आम्ही गेली अनेक वर्ष मुंबई महापालिकेमध्ये निवडून येत आहोत. परंतु साहेब प्रणाली द्वारे वेंडर कोड रजिस्टर करण्याबाबत आम्हाला पहिल्यांदाच महापालिकेच्या मुनिसिपल सेक्रेटरी डिपार्टमेंट कडून कळवण्यात आले आहे. जेव्हा आपण नगरसेवकाच्या उमेदवारीसाठी अर्ज भरतो तेव्हा महापालिकेच्या नियमांमध्ये अशी तरतूद आहे की उमेदवार हा कोणताही वेंडर नसावा परंतु तरी देखील महापालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांना या वेंडरची सक्ती का करण्यात येत आहे असं सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे नगरसेवक विचारत आहेत. तसेच आम्हाला या सॅप वेंडर मध्ये नोंदणी करायची नाही असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरीताई पेडणेकर यांनी दिली.KK/ML/MS