अमृता फडणवीसांनी घेतली बँकींग करिअर मधून निवृत्ती

 अमृता फडणवीसांनी घेतली बँकींग करिअर मधून निवृत्ती

मुंबई, दि. १९ : मुख्यमंत्र्यांची पत्नी असूनही स्वत:च्या करिअरला महत्त्व देणाऱ्या सामाजिक कार्यातून स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या अमृता फडणवीस आता बँकींग क्षेत्रातून निवृत्त होत आहेत. अमृता फडणवीस यांनी बँकिंग क्षेत्रातील आपल्या दीर्घकालीन कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. त्यांनी ‘ॲक्सिस बँक’ (Axis Bank) मधील आपल्या वरिष्ठ पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला असून, तब्बल २३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

बँकिंग क्षेत्रात त्यांनी अत्यंत साध्या पदापासून आपल्या प्रवासाला प्रारंभ केला आणि आपल्या कौशल्याच्या जोरावर त्या ‘ॲक्सिस बँक’मध्ये वेस्टर्न इंडियाच्या कॉर्पोरेट हेड (उप-उपाध्यक्ष) या वरिष्ठ पदापर्यंत पोहोचल्या. पती देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी आपली ही खासगी क्षेत्रातील नोकरी सुरू ठेवून स्वतःची एक वेगळी ओळख जपली होती. मात्र, आता वैयक्तिक आणि सामाजिक कारणास्तव त्यांनी या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत अमृता फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ’23 वर्षांपूर्वी मी अॅक्सिस बँकेमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून रुजू झाले होते. आज मी कृतज्ञतेने भरलेल्या अंत:करणाने वरिष्ठ उपाध्यक्ष पदावरून निवृत्त होत आहे. या काळात मला शाखा व्यवस्थापनापासून ते कॉर्पोरेट बँकिंगपर्यंत आणि ट्रेझरीपासून ते कस्टमर रिलेशन विभागापर्यंतचा अनुभव मिळाला, त्यामुळे ही संस्था माझं कुटुंब, शिक्षक आणि दुसरं घर राहिली आहे.’

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *