बृहन्मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी व विविध समित्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल.

 बृहन्मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी व विविध समित्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल.

मुंबई, दि १८
बृहन्मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी श्री. प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी श्रीमती राजेश्री शिरवडकर, सुधार समिती अध्यक्षपदासाठी श्रीमती संध्या दोशी (सक्रे) यांनी आपले उमेदवारी अर्ज महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे यांच्याकडे आज दाखल केले. तर, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) समितीसाठी श्रीमती तृष्णा विश्वासराव यांनी आपला उमेदवारी अर्ज ‘बेस्ट’चे सह सचिव श्री. सुशील पवार यांच्याकडे आज (बुधवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६) दाखल केला. यावेळी सभागृह नेते श्री. गणेश खणकर, नगरसेवक, नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थि‍त होते.

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ पार पडल्यानंतर सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी महानगरपालिका विशेष सभेत स्थायी समिती व सुधार समितीवर प्रत्येकी २६ सदस्यांची; शिक्षण समितीवर २२ महानगरपालिका सदस्यांची आणि ४ बिगर महानगरपालिका सदस्यांची तसेच ‘बेस्ट’ समितीवर १६ सदस्यांची नामनिर्देशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. या चारही वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याकरिता महानगरपालिका सचिव कार्यालयाने विशेष सभेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

आज (बुधवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६) स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती आणि बेस्ट समिती यांच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची विहित मुदत सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत होती. या कालावधीत प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. शुक्रवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी, तर दुपारी २.०० वाजता स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार आहे.

तर, सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सुधार समिती अध्यक्षपदासाठी आणि दुपारी २.०० वाजता ‘बेस्ट’ समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *