कन्नमवार नगर नाला बाधित करणाऱ्या ३९ बांधकामांचे निष्कासन
मुंबई, दि १८
विक्रोळी येथील कन्नमवार नगर नाला बाधित करणाऱ्या ४३ बांधकामांपैकी ३९ बांधकामांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागाकडून आज (दिनांक १८ फेब्रुवारी २०२६) निष्कासन करण्यात आले. या कारवाईमुळे, सुमारे २४० चौरस मीटर परिसर नाल्याची संरक्षण भिंत उभारण्यासाठी मोकळा झाला.
उप आयुक्त (परिमंडळ-६) श्री. संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (एस विभाग) श्रीमती सय्यद समरिन यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या वतीने कन्नमवार नगर नाल्याभोवती संरक्षण भिंतीचे काम प्रस्तावित आहे. या कामामुळे एकूण ४३ बांधकामे अंशत: बाधित होत होती. यापैकी ३९ अंशत: बाधित बांधकामांचे आज निष्कासन करण्यात आले. तर, उर्वरित ४ बांधकामांचे लवकरच निष्कासन करण्यात येईल.KK/ML/MS