माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी ओसी अमनेस्टी योजना व डेटम लाईन बदलाबाबत केली आयुक्तांकडे मागणी.
मुंबई, दि १८
माजी खासदार मा. श्री. गोपाळ शेट्टीजी यांनी आज महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन ओक्यूपेशंन सर्टिफिकेट अमनेस्टी योजना तात्काळ राबविण्याची तसेच १९६२ ची डेटम लाईन बदलून १ जानेवारी २०११ करण्याची ठोस मागणी केली. ही संकल्पना “OC for All” या ध्येयवाक्यांतर्गत मांडण्यात आली.
ओसी अमनेस्टी योजना – सर्वसामान्यांना दिलासा
माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी स्पष्ट केले की हजारो सदनिकाधारक आणि गृहनिर्माण संस्थांना विकसकांच्या त्रुटीमुळे किंवा प्रक्रियात्मक अडचणींमुळे आजही ओसी मिळालेली नाही.
त्यामुळे पाणी व वीज जोडणी, मालमत्ता कर नियमितीकरण,पुनर्विकास प्रक्रिया,बँक कर्ज व व्यवहारयावर गंभीर परिणाम होत आहे.
निर्दोष घरखरेदीदारांना विकसकांच्या चुका भरून काढण्यासाठी शिक्षा होऊ नये, यासाठी ठराविक दंड/मूल्यांकन शुल्क भरून आणि आवश्यक सुरक्षितता तपासणीनंतर इमारतींना ओसी देण्याची वेळबद्ध आणि पारदर्शक अमनेस्टी योजना राबविण्याची मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे १९६२ ऐवजी १.१.२०११ डेटम लाईन करण्याची मागणी केली.तसेच
शिष्टमंडळाने १९६२ ची डेटम लाईन बदलून १ जानेवारी २०११ करण्याची मागणीही केली.
यामुळे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या लाखो कुटुंबांना कायदेशीर मान्यता मिळेल. तसेच नागरी सुविधा नियमित होतील.तसेच महापालिकेच्या महसुलात वाढ होईल.शेट्टी यांनी नमूद केले की हा निर्णय सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख नागरी विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.
महापालिका आयुक्तांनी शिष्टमंडळाचे म्हणणे संयमाने ऐकून घेतले व संबंधित विभागांकडून अहवाल मागवून विषयाचा प्रशासकीय व कायदेशीर पातळीवर गांभीर्याने विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
एकाही मुंबईकरांना आम्ही ओसी पासून लांब ठेवणार नाही. गोपाळ शेट्टी यांनी मुंबईकरांच्या गृहनिर्माण हक्कांसाठी सातत्याने लढा सुरू राहील, असे या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.या शिष्टमंडळात गणेश खनकर – गटनेते, दीपक तावड़े , अॅड. सिद्धार्थ शर्मा आणि आर्किटेक्ट अरविंद नंदापुरकर उपस्थित होते.KK/ML/MS