बंद बेस्ट इलेक्ट्रिक खांबामुळे शॉर्ट् सर्किट आणि अपघातात वाढ

 बंद बेस्ट इलेक्ट्रिक खांबामुळे शॉर्ट् सर्किट आणि अपघातात वाढ

मुंबई, दि १७
करी रोड येथील महादेव पालव मार्गावरील ब्रिजवर बेस्ट खांबा अर्धवट अवस्थेमध्ये असल्यामुळे येथे शॉर्ट सर्किटमुळे मोठ्या प्रमाणात अपघातात वाढ होत आहे. या मार्गावर पुढे तर रोडचे मध्य रेल्वेचे स्थानक असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच या ठिकाणी असणारे पदपथ हे अत्यंत अरुंद असल्यामुळे आणि या पोलच्या वायरी बाहेर आल्या असल्यामुळे नागरिकांचा या वायरेशी संपर्क येऊन मोठ्या प्रमाणात शॉर्टसर्किट होऊन अपघातामध्ये वाढ होत आहे. तरी येथील हा बंद अवस्थेत असलेला इलेक्ट्रिकचा खांब त्वरित काढावा अशी मागणी स्थानिक रहिवासी, चाकरमानी, दुकानदार आणि पदाचारी करत आहेत.
मी रोज माझ्या मुलाला शाळेत घेऊन जाण्यासाठी या पदापदाचा वापर करत असते. परंतु मागील दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी अचानकपणे जाताना शॉर्टसर्किट झाले आणि या फोन मधून मोठ्या प्रमाणात हात बाहेर आले होते. परंतु अद्यापही हा पोल दुरुस्त्याने झाल्याने आम्ही जीव मोठे घेऊन या ठिकाणी रस्ता ओलांडत असतो अशी माहिती मंदाकिनी पवार या गृहिणीने दिली.
या अर्धवट अवस्थेत असणाऱ्या इलेक्ट्रिकच्या पोल संदर्भात माझ्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार मी बेस्टच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून त्यांना हा फोन त्वरित काढण्यासाठी पत्र लिहिले आहे येत्या एक-दोन दिवसातच हा पोल पूर्णपणे काढून टाकण्यात येईल अशी माहिती स्थानिक नगरसेविका अबोली खाडे यांनी दिली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *