छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम

 छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम

पुणे, दि १६: पुणे महानगरपालिकेच्या औंध रोड कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परिसर स्वच्छता व पाहणीसाठी विशेष संयुक्त मोहीम (ड्राईव्ह) राबविण्यात आली. या मोहिमेत सर्व विभागांचे प्रमुख, वार्ड अधिकारी नायकर यांच्यासह आरोग्य, अतिक्रमण, विद्युत, उद्यान तसेच ड्रेनेज विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

ही पाहणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते राजर्षी शाहू महाराज चौक या मार्गावर घेण्यात आली. पाहणीदरम्यान परिसरातील स्वच्छता, अतिक्रमण, विद्युत व्यवस्था, हिरवळ तसेच ड्रेनेज व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात आला. 

या वेळी उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्यासह नगरसेवक सनी निम्हन, नगरसेविका सपना छाजेड, भक्ती गायकवाड तसेच आनंद छाजेड, अमित मुरकुटे, अविनाश कदम व अन्य स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी परशुराम वाडेकर, उपमहापौर, पुणे यांनी अशाच स्वरूपाची मोहीम दोन महिन्यांतून एकदा संपूर्ण शहरातील सर्व प्रभागांतील झोपडपट्ट्या व प्रमुख रस्त्यांवर राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिले. या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे नागरिकांच्या दैनंदिन समस्या तातडीने सोडविण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *