रमाबाई आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी 39 कोटींची साडी
मुंबई,दि. ९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम पत्नी रमाबाई आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात येणार आहे. रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना म्हणून 39 कोटींची साडी बनवण्यात येत आहे. या साडीसाठी 33 कोटींचे हिरे आणि दोन किलो सोन्याचा वापर होणार आहे. माता रमाईंच्या स्मरणार्थ गोल्डन मॅन रोहित पिसाळ यांनी ही साडी बनवली आहे. संपूर्ण साडीवर सोन्याचा मुलामा चढवण्यात येत आहे. माता रमाई यांच्या कपाळावरील कुंकवाच्या जागी 33 कोटींचे हिरे लावण्यात येणार आहेत.
39 कोटी रुपयांची साडी बनवण्याच्या मागे माझे ध्येय होते. बाबासाहेबांनी ज्या काळात घर नव्हती तेव्हा हिंदू कॉलनीमध्ये राजगृह उभे केले. ज्या मातेने त्यागाने एवढे मोठे सगळं उभे केले तिचा पदर मला हिऱ्याने सजवायचा आहे असे रोहीत पिसाळ म्हणाले.
रोहित पिसाळ हे उद्योजक आहेत. समुद्रा खाली खनन करून ते सोने शोधण्याचा व्यवसायात करत आहेत. पिसाळ यांच्या संपूर्ण कार्यालयात अस्सल सोन्याने रंगविलेल्या कलाकृती आहेत. त्यात पेंटिंग्स, कपडे, साइकल, बूट आणि बऱ्याच गोष्टी आहेत.
SL/ML/SL