She Marts – महिला बचत गटांसाठी रिटेल आउटलेट्स
नवी दिल्ली, दि. 2 : स्वयंसहाय्यता बचत गटांमुळे देशभरातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ मिळाले आहे. या उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी आता महिला बचत गटांसाठी She marts ही रिटेल आउटलेट्स सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे महिला कल्याण केवळ ‘कर्ज-आधारित उपजीविका’ पुरते मर्यादित राहणार नाही. महिलांना समान भागीदार आणि त्यांच्या व्यवसायाच्या मालक बनवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. या दिशेने शी मार्ट्स (सेल्फ हेल्प आंत्रप्रेन्योर मार्ट्स) ची घोषणा करण्यात आली आहे.
हे असे रिटेल आउटलेट्स असतील, जे स्वयं सहायता गटांशी संबंधित महिला चालवतील. सरकार त्यांची ग्रामीण भागात आणि लहान शहरांमध्ये स्थापना करेल. येथे महिला आपली उत्पादने थेट ग्राहकांना विकू शकतील. महिलांना मध्यस्थांच्या तावडीतून बाहेर काढणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. जेणेकरून, उत्पादनांचा थेट आणि अधिक नफा महिलांपर्यंत पोहोचेल.
मार्ट्सच्या माध्यमातून महिलांच्या स्थानिक उत्पादनांना ‘ब्रँड’ म्हणून ओळख मिळेल. त्यांना केवळ बाजारपेठच नाही, तर आधुनिक आर्थिक साधने आणि ब्रँडिंग सपोर्ट देखील दिला जाईल.
‘शी मार्ट्स’ ही संकल्पना लखपती दीदींच्या यशातून मिळाली. या उपक्रमाने काम सुरू करायला शिकवले. शी मार्ट्स त्या कामाचे व्यवसायात रूपांतर करेल. 3 कोटी महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावू लागल्या आहेत. आता 5 कोटी लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य आहे. मात्र, शी मार्ट्ससाठी अर्थसंकल्प (बजेट) जाहीर करण्यात आलेला नाही.
SL/ML/SL