मुंबईतून 36 तासांत 12 अल्पवयीन मुलंमुली बेपत्ता
मुंबई, दि. २ : मुंबईत गेल्या 36 तासांमध्ये एकट्या मुंबई शहरातून 12 अल्पवयीन मुलं आ बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेपत्ता झालेल्या या 12 मुलांमध्ये 8 मुलींचा समावेश असून, ही मुलं मुंबईतील 7 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गायब झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबई पोलीस यंत्रणासुद्धा सध्या शहरातील या प्रकाराकडे अतिशय गांभीर्यानं पाहत असून, त्यात आता तपास यंत्रणांच्या हाती नेमके कोणते पुरावे लागतात हे पाहणं मह्त्वाचं ठरणार आहे. मुंबईत घडणाऱ्या या घटना पाहता, पोलीस यंत्रणांनीसुद्धा या घटनेची गांभीर्यानं दखल घेत शहरात ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.
मानवी तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्या शहरात सक्रिय असल्याची भीती यामुळं व्यक्त केली जात असून सदर प्रकरणी पालकांच्या तक्रारींवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये कलम 137 (2) अंतर्गत 12 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बेपत्ता झालेल्या मुलांमध्ये शिवाजी नगर भागातून 4 मुलं, साकीनाका भागातून 2 मुलं, अँटॉप हिलपरिसरातून 2 मुलं बेपत्ता झाली आहेत. तर, ओशिवरा, मानखुर्द, बांगूर नगर आणि घाटकोपरमधून प्रत्येकी 1 मुल बेपत्ता असल्याची माहिती आहे.

SL/ML/SL