श्रावण दादा यशवंते यांचा स्मृतिदिन काळाचौकी येथे पार पडला
मुंबई प्रतिनिधी, दि. ३१ : पंचशील सेवा संघ आणि श्रावण दादा यशवंते परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने आंबेडकर चळवळीतील लोकशाहीर गायक श्रावण दादा यशवंते यांचा 48 वा स्मृतिदिन सुनंदाताई लोकेगावकर सभागृह काळाचौकी येथे राजाराम खरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सदर प्रसंगी यशवंते यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या ठिकाणी विविध सामाजिक आणि लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुमधुर गायन सदर करण्यात आले. श्रावण दादा यशवंते यांचे काम घरोघरी पोहोचलेले होते. आंबेडकरी चळवळीतील त्यांचा कार्याचा आलेख नेहमी चढता होता.
यशवंत यांनी कधी भेदभाव केला नाही त्यांनी सर्वसामान्य जनतेचे काम केले त्यामुळे आजही त्यांचे काम लोकांच्या स्मृतीमध्ये राहिले असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष तसेच समाजसेवक शिरीष चिखलकर यांनी दिली. सुरेश केदारे किसन माने,किरण सोनवणे, कीर्तीपाल गायकवाड, वैशाली सांगारे लाड उत्तम खरात,संदेश उमप अजित पवार, संतोष गांगुर्डे अनुजा आजबेलकर, सुमेध जाधव, पंचशील सेवा संघाचे कार्यकर्ते श्रावण यशवंते परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाला अभ्युदय नगर काळाचौकी विभागातील सर्व धर्मीय नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती