मुंबईमध्ये AI इंजिनिअर्सना नोकरीच्या मोठ्या संधी

 मुंबईमध्ये AI इंजिनिअर्सना नोकरीच्या मोठ्या संधी

मुंबई, दि. २९ : मुंबईतील रोजगार बाजारपेठेत २०२६ मध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. लिंक्डइनच्या संशोधनानुसार, ७२ टक्के भारतीय प्रोफेशनल्स नवीन पदांचा शोध घेत आहेत, मात्र ३८ टक्के जणांना तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक कौशल्यांची कमतरता जाणवते. या पार्श्वभूमीवर लिंक्डइनने “जॉब्स ऑन द राइज २०२६” यादी जाहीर केली आहे.

मुंबईत एआय इंजिनिअर हे सर्वाधिक वेगाने वाढणारे पद ठरत असून, त्याशिवाय कॉन्फरन्स प्रॉड्युसर, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी, ब्रँड कन्सल्टंट, स्ट्रॅटेजिक अडव्हायजर आणि व्हेटेरिनेरियन यांसारख्या पदांना देखील मागणी वाढत आहे. यामुळे तंत्रज्ञानाबरोबरच सर्जनशील, सल्लागार आणि नेतृत्व क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होत आहेत.

लिंक्डइन करिअर तज्ज्ञ निरजिता बॅनर्जी यांच्या मते, मुंबईतील रोजगार बाजारपेठ अनेक वर्षांनंतर अनुकूलतेकडे वाटचाल करत आहे. नियोक्ते प्रकल्पांमधून कौशल्य दाखवणाऱ्या आणि स्थिर राहणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देत आहेत.

संशोधनात असेही दिसून आले की, ९४ टक्के प्रोफेशनल्स रोजगार शोधण्यासाठी एआयचा वापर करतात, पण जवळपास अर्ध्यांना हायरिंगमध्ये एआयचा प्रभावी वापर कसा करावा हे माहित नाही. तरीही ६५ टक्के जणांचा विश्वास आहे की एआयमुळे रिक्रूटर्सशी संवाद सुधारेल आणि उमेदवारांना अधिक संधी मिळतील.

मुंबईतील टॉप १० जॉब्स:
१. एआय इंजिनिअर
२. कॉन्फरन्स प्रॉड्युसर
३. डायरेक्टर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स
४. डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी
५. ब्रँड कन्सल्टंट
६. स्ट्रॅटेजिक अडव्हायजर
७. रिसर्च इन्स्ट्रक्टर
८. ॲडव्हर्टायझिंग मॅनेजर
९. क्वॉन्टिटेटिव्ह रिसर्चर
१०. व्हेटेरिनेरियन

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *