हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमात भाविकांची अलोट गर्दी

 हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमात भाविकांची अलोट गर्दी

नांदेड दि २५ – “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मान्यवरांसह लाखो भाविकांनी “वाहे गुरु” व “बोले सो निहाल सत श्री अकाल” च्या जयघोषात श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले.

आज दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. देशातील विविध राज्यातून आलेल्या सर्व धर्माच्या भाविकांनी शांतता, शिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत.

भाविकांच्या सोयीसाठी
आयोजकांच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे सुरू आहे. भाविकांच्या भोजनासाठी भव्य लंगरची व्यवस्था केली असून भाविक याचा लाभ घेताना दिसून येत आहेत. गुरुद्वारातर्फे भाविकांसाठी अखंड कीर्तन सुरू आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी भाविकांसाठी लोकसहभागातून चहा, अल्पोपहार, ज्यूस, विविध स्टॉल उभारण्यात आलेले आहेत.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचे स्मरण या शहीदी समागमाच्या माध्यमातून करण्यात येत असून या कार्यक्रमातून समाजात बंधुता व एकतेचा संदेश दिला जात आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *