सातरस्ता येथे अनधिकृत फेरीवाल्यांमुळे नागरिक हैराण

 सातरस्ता येथे अनधिकृत फेरीवाल्यांमुळे नागरिक हैराण

मुंबई, दि २५
महालक्ष्मी येथील सातरस्ता परिसरामध्ये श्रीराम हॉटेल च्या बाजूला मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडल्यामुळे नागरिकांना चालणे देखील फार कठीण झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सातरस्ता येथील धोबी घाटाच्या बाजूला असणाऱ्या या पदपथावर मोठ्या प्रमाणात वडापाव, चायनिज आणि ज्यूसचे अनधिकृत स्टॉल लावले आहेत. या स्टॉलवर बसूनच अनेक नागरिक या ठिकाणी चायनीज खात असतात. हे स्टॉल एवढे मोठे आहेत की या पदपथावरून चालणे फार मुश्किल झाले आहे. सात वाजता परिसरात अनेक खाजगी आणि शासकीय कार्यालय आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांची गर्दी असते. त्याचप्रमाणे बाजूलाच महालक्ष्मी रेल्वे स्थानक असल्याने या ठिकाणी रेल्वे प्रवाशांच्या देखील मोठ्या प्रमाणात वावर असतो. तसेच बाजूला धोबी गाड असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक आपले कपडे धुण्यासाठी या ठिकाणी येत असतात. परंतु त्यांना देखील या फेरीवाल्यांचा हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हिरोची स्थानिक वर्ष कसे करून ते देखील मेटाकोटीला आले आहेत. तरी या ठिकाणी असणारे अनधिकृत फेरीवाल्यांना थोडी तुटवावे आणि हा पदपत नागरिकांसाठी त्वरित खुला करावा अशी मागणी स्थानिक दुकानदार, पादचारी आणि चाकरमानी करत आहेत.
मी रोज माझ्या मुलाला शाळेतून या पदपथवरून घेऊन येत असते. परंतु रोज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या अनधिकृत फेरिवाल्यामुळे आम्हाला चालणे देखील फार त्रासदायक झाले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्नपदार्थ शिजवले जात असल्याने या ठिकाणी तेल उडून अंगावर पडण्याच्या धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरी येथील अनधिकृत फेरीवाल्यांना त्वरित उचलावे अशी मागणी दीपिका सचदेव या गृहिणीने दिली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *