अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात तणाव; रुपयाचा नीचांक
जितेश सावंत
गेल्या आठवड्यात जागतिक तसेच देशांतर्गत घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FIIs) सततची विक्री, जागतिक बाँड यिल्डमध्ये झालेली वाढ आणि अमेरिका–युरोपमधील व्यापार शुल्क (Tariffs) धोरणातील अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रुपयाची ऐतिहासिक घसरण
शुक्रवारी इंट्राडे व्यवहारादरम्यान भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९१.९९ च्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला. रुपयाची ही कमजोरी शेअर बाजारातील अलीकडील निराशेमागील एक प्रमुख कारण मानले जात आहे. गेल्या वर्षी सुमारे ५ टक्क्यांनी घसरल्यानंतर, चालू वर्षात आतापर्यंत रुपया २ टक्क्यांहून अधिक कमजोर झाला आहे.
FIIs ची आक्रमक विक्री
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या आक्रमक विक्रीमुळे बाजारावर दबाव कायम आहे. जानेवारी महिन्यात आतापर्यंत FIIs ने ३६,५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे भारतीय शेअर्स विकले आहेत. या विक्रीमुळे बाजारातील तेजीला ब्रेक लागला असून, तरलतेवर परिणाम झाला आहे आणि मंदीची भावना अधिक तीव्र झाली आहे.
जागतिक आणि देशांतर्गत दबाव
जागतिक पातळीवर व्यापार युद्धाची शक्यता, मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि वाढते बाँड यिल्ड्स हे बाजारासाठी नकारात्मक ठरत आहेत. देशांतर्गत आघाडीवर बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा कमकुवत तिमाही निकाल बाजाराची निराशा वाढवत आहेत. जरी काही शेअर्समध्ये ‘व्हॅल्यू बायिंग’ दिसून येत असली, तरी जागतिक दबावामुळे बाजाराला ठोस गती मिळताना दिसत नाही.
अर्थसंकल्पाकडे बाजाराचे लक्ष
२०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार सावध भूमिकेत आहेत. सरकारकडून पायाभूत सुविधांमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवणे, रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि दीर्घकालीन भांडवली नफा कर (LTCG) तर्कसंगत करणे यांसारख्या उपाययोजनांची बाजाराला अपेक्षा आहे.
दरम्यान, रविवारी दि. ०१ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असल्याने शेअर बाजार नेहमीप्रमाणे सुरु राहतील . अर्थसंकल्पानंतर बाजाराची पुढील दिशा अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
बाजार ओव्हरसोल्ड झोनमध्ये
तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टीने पाहता, बाजार सध्या ‘ओव्हरसोल्ड झोन’मध्ये पोहोचले आहेत, अशा परिस्थितीत मर्यादित कालावधीसाठी तांत्रिक उसळी (Technical Bounce) येण्याची शक्यता आहे, मात्र जागतिक घडामोडी आणि अर्थसंकल्पाशी संबंधित संकेत निर्णायक ठरणार आहेत.
From a technical perspective, Indian equity markets have entered an oversold zone,. While this increases the probability of a technical bounce, sustainability will depend on global cues and Budget-related Announcements.
Technical Analysis of Nifty:
Closing on Friday: Nifty closed at 25048.7
KeySupportLevels:
25003,24983,24923,2490224892,24872,24837,24750,24730,24718,24690,and24630,Breaking these could lead the Nifty to further lower levels.
ResistanceLevels:,
25128,25170,25223.25256,25289,25344,2537624424,25476,25517,and25578.These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.
लेखक शेअर बाजार,सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदा तज्ज्ञ आहेत.
The author is an expert in stock market, cyber law, and data protection law.
ईमेल:jiteshsawant33@gmail.com
ML/ML/MS