रोहीत शर्माला या विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट
नवी मुंबई, दि. २३ : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘हिटमॅन’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या रोहित शर्माला आता एक खास सन्मान मिळणार आहे. रोहित शर्माला डिवाय पाटील यूनिवर्सिटीकडून मानद डॉक्टरेट (D.Litt.) ने सन्मानित करण्यात येणार आहे. 24 जानेवारी 2026 रोजी आयोजित होणाऱ्या दीक्षांत समारोहात हिटमॅनला हा किताब मिळणार आहे. यूनिवर्सिटीकडून जाहीर करण्यात आलं की युनिव्हर्सिटीच्या 10 व्या कॉन्वोकेशन सेरेमनीमध्ये रोहित हा आकर्षक केंद्र असेल. भारतीय क्रिकेटमधील आणि जगातील पातळीवर रोहित शर्माने मिळवलेल्या उपलब्धतेसाठी त्याला रोहित शर्माला सन्मानित करण्यात येणार आहे.
कपिल देव आणि एम एस धोनीच्यानंतर रोहित शर्मा हा भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा तिसरा कर्णधार आहे. हिटमॅनच्या नेतृत्वात भारताने टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये विजेतेपद पटकावलं, तर रोहितच्या नेतृत्वात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकण्यात सुद्धा भारताला यश आलं. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने आशिया कप स्पर्धा सुद्धा जिंकली आहे.
SL/ML/SL