पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह
सोलापूर दि २३ :- वसंत पंचमीच्या निमित्ताने आज पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. अनुराधा दीदी शेटे यांची स्वयंवर कथा झाल्यावर विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या उत्सव मूर्ती एकमेकांसमोर आणण्यात आल्या. आंतरपाठ दोन्ही मूर्तीसमोर धरण्यात आल्या. आणि संपन्न झाला विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा. या सोहळ्यासाठी पंढरपुरात लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. यासाठी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी संपूर्ण मंदिरात विवाहाचे नेटके नियोजन केले होते.ML/ML/MS