युद्ध सोडवण्यासाठी ट्रम्प यांनी लाँच केले ‘बोर्ड ऑफ पीस’
दावोस, दि. २२ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच धक्कादायक निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. ग्रीनलँण्ड वर हक्क सांगत दररोज प्रक्षोभक विधाने करणाऱ्या ट्रम्प यांनी आज दावोसमध्ये युद्ध सोडवण्यासाठी तयार केलेले ‘बोर्ड ऑफ पीस’ लाँच केले. ते म्हणाले की, या बोर्डचा सुरुवातीचा उद्देश गाझामधील युद्धविराम मजबूत करणे हा आहे, परंतु पुढे जाऊन हे इतर जागतिक विवादांमध्येही भूमिका बजावू शकते. व्हाईट हाऊसने या बोर्डमध्ये सामील होण्यासाठी 60 देशांना निमंत्रण पाठवले होते, परंतु केवळ 20 देशच स्वाक्षरी समारंभात उपस्थित होते. यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या व्यतिरिक्त सौदी अरेबिया, कतार, यूएई, अर्जेंटिना आणि पराग्वेचे नेते उपस्थित होते.
भारताकडून कोणीही स्वाक्षरी समारंभात सामील झाले नाही. तर अमेरिकेचे सहयोगी मानले जाणारे बहुतेक युरोपीय देशही या समारंभातून अनुपस्थित होते. आधी असे मानले जात होते की कार्यक्रमात 35 देशांचे नेते सामील होऊ शकतात. ट्रम्प यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर 2025 मध्ये पहिल्यांदा गाझा युद्ध संपवण्याची योजना सादर करताना या बोर्डचा प्रस्ताव ठेवला होता.
SL/ML/SL