थोरियमवर आधारित पहिले वीज निर्मिती केंद्र महाराष्ट्रात
मुंबई, दि. २२ : भारतातील पहिले थोरियमवर आधारित वीज निर्मिती केंद्र महाराष्ट्रात उभारले जाणार आहे. हे केंद्र महाराष्ट्राच्या ‘महाजेनको’ कंपनीच्या मालकीच्या जागेवर बांधले जाणार आहे. थोरियम हे स्वदेशी इंधन असल्याने आपल्याला परदेशी युरेनियमवर अवलंबून राहण्याची गरज नाही. भारतात थोरियमचे जगातील सर्वाधिक साठे आहेत. ज्याचा फायदा घेऊन देश स्वयंपूर्ण होईल. हे इंधन कमी किरणोत्सर्गी कचरा निर्माण करते. ज्यामुळे पर्यावरणाला कमी नुकसान होते. सामान्य वीज केंद्रांपेक्षा हे अधिक स्वच्छ आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. यामुळे केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत’ ध्येयाला हातभार लागणार आहे..
या योजनेत दोन मुख्य भाग आहेत. पहिले केंद्र 1540 मेगावॅट क्षमतेचे तर दुसरे 440 मेगावॅटचे असणार आहे. हे जुने थर्मल पॉवर प्लांट जागेवर नव्याने उभारले जाणार आहेत. थोरियम हे भारतात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, विशेषतः केरळ, तमिळनाडू, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरील रेतीत ते मोठ्या प्रमाणावर आढळते. हे केंद्र सामान्य दाबावर चालते, ज्यामुळे ते अधिक विश्वासार्ह आहे. या बांधकामामुळे राज्याची वीज निर्मिती क्षमता वाढून कार्बन उत्सर्जन कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.
SL/ML/SL