छत्रपतींच्या वंशजांना पोलंड सरकारकडून खास आमंत्रण
कोल्हापूर, दि. २१ : पोलंड सरकारच्या खास निमंत्रणावरून कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे सहकुटुंब दावोस दौऱ्यावर आहेत. पोलंड आणि कोल्हापूरचा फार जुना संबंध आहे. छत्रपती घरण्याशी असलेला हे संबंध पोलंडने आजही जपले आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी, हिटलरच्या जर्मनीने पोलंडमध्ये घुसखोरी करत ताबा मिळवला होता. पोलंडचे लोक विस्थापित झाले. 1943 मध्ये पोलंडचे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील स्त्रीया आणि वृद्धांसोबत भारतात शरणार्थी म्हणून आले होते. त्यापैकी पाच हजार जणांना छत्रपतींनी वाळिवडे, कोल्हापूरात शरण दिली होती. महाराजांनी देशात सर्वात मोठा पोलिश शरणार्थी कॅम्प कोल्हापुरात लावला होता. पोलंडनेही कोल्हापूरशी जुळलेल्या नात्याच्या स्मरणार्थ वॉरसॉ येथे ‘माँटे कॅसिआनो वॉर मेमोरिअल’ (Monte Cassino War Memorial, Warsaw) बांधलं आहे. छत्रपती संभाजीराजे 2025 मध्ये तिथे भेट देऊन आले होते.
पोलंडने परत 2026 ला दावोसमध्ये छत्रपती संभाजीराजेंना वर्ल्ड इकनॉमिक फोरमसाठी ‘लिडर्स फोरम – पॉवर्ड बाय पोलंड’ (Leaders Forum – Powered by Poland) या विशेष कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित केलेलं.
SL/ML/SL