मुंबईत सी फूड फेस्टिव्हल आयोजन
मुंबई, दि. २१ : वेसावा मच्छिमार सहकारी सोसायटीच्या समोरील मैदानावर हा महोत्सव २३ ते रविवार, २५ जानेवारी दरम्यान सी फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा महोत्सवाचे हे १९ वे वर्ष आहे. वेसावा कोळी सी फूड फेस्टिव्हलचे अध्यक्ष स्वप्नील भानजी आणि उपाध्यक्ष महेंद्र लडगे यांनी ही माहिती दिली.
महोत्सवाचे यजमानपद यंदा वेसावा कोळी जमात पब्लिक रिलिजस अँड चॅरिटेबल ट्रस्ट यांना असून वेसावा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, वेसावा कोळी सर्वोदय सहकारी सोसायटी, वेसावा कोळी मच्छिमार नाखवा मंडळ ट्रॉलर यांचे त्यांना सहकार्य करणार आहे. गेल्या वर्षी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, वसई-विरार,कल्याण, अंबरनाथ येथील ५० हजारांहून अधिक लोकांनी या महोत्सवाला भेट दिली होती.
कोळी समाजाची संस्कृती, परंपरा, खाद्य पद्धती आणि जेवणाची लज्जत महोत्सवात अनुभवायला मिळत आहे. मासळीच्या विविध जाती, निरनिराळ्या पारंपरिक खाद्यदार्थांचे प्रदर्शन तसेच विक्री, वेसावकरांचे कोळी नृत्य आणि परंपरा इत्यादींचे दर्शनही या तीन दिवसांच्या महोत्सवात होणार असल्याची माहिती महेंद्र लडगे व खजिनदार विशाल चंदी यांनी दिली.
SL/ML/SL