मुंबईचे पोस्टमन आणि पोस्टवूमन चालवणार इ – बाईक.

 मुंबईचे पोस्टमन आणि पोस्टवूमन चालवणार इ – बाईक.

मुंबई, दि २१

जीपीओ मुंबईची टपाल आणि पार्सल वितरण सेवेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी महाराष्ट्र सर्कलने पोस्टमन आणि पोस्टमहिलांना २०० ई-बाईक्सचे आज अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीपीओ येथे वितरण केले. यानिमित्ताने १९७१च्या लोंगेवालाच्या विजयी लढाईच्या स्मरणार्थ एका विशेष पोस्टल कव्हरचे आणि ‘संदेश वीरां को’ या पोस्टकार्ड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, जय श्रीराम चा बुलंद नारा देत मुंबई महापालिकेत महायुतीचा मराठी महापौर होईल, असे अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

जीपीओतील या कार्यक्रमात मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग, संचालक मनोज कुमार, सुश्री सिमरन कौर, मुंबई जीपीओ संचालक रेखा रिझवी,सीईओ मधु रघुनाथन आदी मान्यवर उपस्थित होते. या समारंभात टपाल कर्मचाऱ्यांसाठी २०० इलेक्ट्रिक वाहनांचे अधिकृत उद्घाटन आणि १९७१ च्या ऐतिहासिक लोंगेवालाच्या लढाईच्या सन्मानार्थ एका विशेष पोस्टल कव्हरचे प्रकाशन, राष्ट्रीय मोहीमेचा भाग म्हणून ‘संदेसे वीरां को’ पोस्टकार्ड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या ई-बाईकमुळे पोस्टाच्या ऑपरेशनल कार्यक्षमता वाढते, वितरण वेळ कमी होईल, वितरण कर्मचाऱ्यांवरील शारीरिक ताण कमी होऊन टपाल सेवांना बळकटी मिळणार असल्याचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यांनी सांगितले.
मुंबईत महायुतीचा महापौर !

कार्यक्रमानंतर अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये प्रचंड काम करत आहेत. तेथील करार पाहता देशात रोजानारांच्या संधी निर्माण होणार आहे. शिवाय बायको मुलीला सोडून देवेंद्रजी तेथे पिकनिकला कसे जातील, असा कोपरखळी करत त्यांनी उबाठाचे खासदार संजय राऊत यांचा आरोपाचा समाचार घेतला. आपल्या भाषणात त्यांनी जय श्रीरामचा बुलंद नारा दिला. मुंबई महापालिकेत महायुतीचा मराठी महापौर होईल, असा पुनरुच्चार त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *