कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक येथील तुटलेल्या पेव्हर ब्लॉकमुळे प्रवासी हैराण
मुंबई, दि २१
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील महत्वाचे स्टेशन पैकी एक असलेले कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक आता प्रकाशझोतात आले आहे. हे स्थानक प्रवाशांनी फार गजबजलेले असते.या रेल्वे स्थानकाच्या बाजूला अनेक खाजगी कंपन्या तसेच अनेक शाळा, बीपीटी कार्यालये असल्याने या ठिकाणी कायम गर्दी असते. परंतु आता हे रेल्वे स्थानक मृत्यूचा सापळा बनत चाललेले आहे. या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर चढताना वडाळा दिशेने मोठ्या प्रमाणात पेव्हर ब्लॉक तुटल्याने खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर चढताना तोल जाऊन रेल्वे प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. तर रात्रीच्या वेळेस हे खड्डे दिसले नसल्याने अनेक प्रवासी प्लॅटफॉर्म वरून खाली येताना घसरून पडत आहेत. तरी हे पेव्हर ब्लॉक आणि खड्डे त्वरित बुजवावी अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत. हि रोजची तारेवरची कसरत करावी लागत असल्याने रेल्वे प्रवासी हैराण झाले आहेत.
या तुटलेल्या पेपर ब्लॉक बद्दल माझ्याकडे अनेक रेल्वे प्रवाशांनी तक्रारी केले आहेत त्यानुसार मी माझे पत्र रेल्वे प्रशासनाला दिलेले आहेत त्यानुसार लवकरच या ठिकाणची पेवर ब्लॉक रिपेरिंग होतील अशी माहिती शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.
याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांच्याशी संपर्क साधला असता हे तुटलेले पेवर ब्लॉक त्वरित दुरुस्ती करण्यात येतील अशी माहिती मिळाली.KK/ML/MS