जीईई परिक्षेस जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सेंटरवर पोहचण्यास करावी लागली कसरत
पुणे, दि २१: देश पातळीवरील नामांकित संस्थांमध्ये अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवे्शासाठी घेण्यात येणार्र जेईई मेन’ परीक्षा सध्या सुरू आहे पहिल्या सत्रातील जेईई मेन् परीक्षा २१ ते २४ जानेवारी दरम्यान होत आहे. दरम्यान, पुण्यात पणे ग्ँंड ट्र’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होत असून यानिमित्त शहराच्या विविध भागातील वाहतुकीत बदल केल्यान् अनेक रस्ते बंद आहेत. परिणामी. ‘जिेर्डड मेन’परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याना वेळेत परीक्षा केंद्रावर पोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली आहे.
MR2205-iON डिजिटल झोन iDZ रामटेकडी 2, GATE 2, सहयोग डिजिटल हब, S. No. 107/01, प्लॉट नं.7, रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट नं.2, एचपी पेट्रोल पंपाजवळ, हडपसर, पुणे, महाराष्ट्र, भारत, 411013 येथे परीक्षांचे केंद्र होते. पिंपरि चिंचवड, पुणे शहरातील विद्यार्थ्यांना येथे जाण्यासाठी कॅम्प परिसर पार करुनच जाण्याचा मार्ग होता. परंतू ‘पुणे ग्रँड टूर असल्या कारणाने सर्व रस्ते बंद होते. या मुळे सर्वाना जहांगीर वरुन जाण्यासाठी पोलिसांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे सर्व ट्रफीक जहांगीर चौकात दिसून आली.
तसेच पुणे ग्रँड टूर सुव्यवस्थित होण्यासाठी सर्व पोलिस फोर्स चा वापर टूर साठीच करण्यात आल्याचे दिसून आले.
कारण राम टेकडी चौकापासून जेईई परिक्षा केंद्र सुमारे दोन कि.मी अंतरावर आहे. सदर सेंटर कडून वाहतुक निमंत्रण किंवा प्रशासन अथवा पोलिसांकडून कुठल्याही प्रकारच्या नियंत्रणासाठी उपाययोजना दिसून आली नाही.
ऐवढेच नव्हे तर वानवडी पोलिसचौकातील पोलिसांची च गाडी रस्त्यावर पार्क केली होती आधीच ट्रॅफिक त्यात यांची भर, ट्रॅफिक कंट्रोल न करता ट्रॅफिक केलेले दिसून आले. गाडी जवळ उभे पोलिस कर्मचाऱ्यांस यासंदर्भात विचारले असता ड्रायव्हर टॉयलेटला गेला आहे असे उत्तर मिळाले.
सेंटर वर सुमारे 1000 ते 2000 पालक वर्ग दिसून आला परंतू या परिसरात पालकांना स्वच्छतागृहाची ही व्यवस्थापन नव्हते.
स्वारगेट, सॅलिसबरी पार्क मध्ये राहणाऱ्या नागरिकांना ही जहांगीर चौकात येवून मग वानवडीला यावे लागले. सेंटर पोहचण्यासाठी कोणाला दोन तास तर कोणाला अडीच तास लागले, तर कोणाला एक तास. KK/ML/MS