चर्चगेट येथील पदपथावरील नामफलकामुळे पादचारी हैराण
मुंबई, 20
चर्चगेट येथील मेट्रो स्थानकाबाहेर पदपथावर मध्यभागी लावलेल्या चर्चगेट नामफलकामुळे येथील रहिवासी, पादचारी हैराण झाले आहेत. चर्चगेट येथील मेंट्रो मोठ्या प्रमाणामध्ये चर्चगेट हे नामफलक पदपत्राचे मध्यभागी लावण्यात आले आहे त्यामुळे येथील पादचाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना चालणे देखील अवघड झाले आहे. ही रोजची तारिवरची कसरत करावी लागत असल्याने येथील पादचारी आणि स्थानिक रहिवासी यांना नाक त्रास सहन करावा लागत आहे. तरी येथील हा पदापदाचे मध्यभागी असणारा नामफलक त्वरित काढावा आणि पादचार्यांना पदपत मोकळा करून द्यावा अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशी दुकानदार आणि पादाचारी करत आहे. चर्चगेट येथे मोठ्या प्रमाणावर खाजगी आणि शासकीय कार्यालय असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाकरमानी येजा करत असतात. तसेच नव्याने बनवलेल्या ठिकाणी प्रवाशांचे वर्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. स्थानकाच्या बाहेरच एमएमआरसी कंपनीने चर्चगेट नावाचा मोठा नाम फलक पदपत्राच्या मध्यभागी उभारला आहे. हा फलक दहा फूट लांबीचा असल्याने हा वडावे असल्यामुळे या फलकाच्या बाजूने पादचऱ्यांना जावे लागत आहे. पदपत्राच्या बाजूला मोठ्या प्रमाणात वाहने उभी असल्यामुळे नागरिकांना वाहनांमधून वाट काढून जावे लागत आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालताना मोठ्या प्रमाणात अपघातामध्ये वाढ होत आहे. तरी या ठिकाणी पदपथाच्या मध्यभागी असणारा हा भला मोठा नामफलक त्वरित एमएमआरसी प्रशासनाने काढून टाकावा अशी मागणी येथील स्थानिक रहिवासी, दुकानदार, पादचारी आणि कर्मचारी करत आहेत.
याबाबत एमएमआरसी कंपनीशी संपर्क साधला असता या पदपथाच्या मध्यभागी असणारा नामफलक बाबत आम्ही वरिष्ठ अधिकारी यांना कळवले असल्याची माहिती एम एम आर सी कर्मचाऱ्यांनी दिली.KK/ML/MS