चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर खड्डेच खड्डे
मुंबई, दि १९
चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यामुळे नागरिक हैराण झाले असून हे खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहे. हे खड्डे एवढे मोठे आहेत की या खड्ड्यांमध्ये दुचाकीची चाक अडकून मोठ्या प्रमाणात अपघात वारंवार घडत आहेत. तसेच या खड्ड्यांमध्ये घाणीचे पाणी साचून चाकरमान्यांच्या अंगावर उडून कपडे खराब होण्याच्या घटना वारंवार घडत आहे. तसेच रात्रीच्या वेळी या ठिकाणी अंधार असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाय अडकून पडण्याचे वारंवार प्रकार या ठिकाणी वारंवार घडत आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात खाजगी आणि शासकिय कार्यालय असून त्यांना या खड्ड्याचा रोज सामना करावा लागत आहे. तसेच या परिसरातच मंत्रालय असल्याने हजारो नागरिक रोज आपले शासकीय काम करण्यासाठी महाराष्ट्रतील कानाकोपऱ्यातून येत असतात. त्यांनाही या खड्ड्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी हे खड्डे तातडीने बुडवावे तसे मागणी येथील चाकरमानी,स्थानिक रहिवाशी, दुकानदार आणि पादचारी करत आहेत.KK/ML/MS