दिल्ली उभारली जाणार ५० स्वयंचलित हवामान दर्शक केंद्रे
नवी दिल्ली ,१५ जानेवारी : शहर-स्तरीय हवामान निरीक्षण मजबूत करण्यासाठी आणि रिअल-टाइम डेटा संकलन सुधारण्यासाठी, भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय दिल्लीमध्ये ५० स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्यावर काम करत आहेत, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी सांगितले.
येथे आयएमडीच्या १५१ व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याला संबोधित करताना, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री सिंह म्हणाले की, जमिनीवरील निरीक्षणे आणखी सुधारण्यासाठी मंत्रालय शेतकरी, पंचायती आणि कृषी क्षेत्राला सोबत घेऊन एक स्वतंत्र पर्जन्यमान निरीक्षण कार्यक्रम सुरू करण्याच्या शक्यता पडताळून पाहत आहे.
स्वयंचलित हवामान केंद्रे (AWS) ही अशी निरीक्षण उपकरणे आहेत जी हवामानाची माहिती आपोआप गोळा करतात, साठवतात आणि प्रसारित करतात.