देशातील सर्वांत लहान वेटलिप्टर, पुण्यातल्या ६ वर्षांच्या चिमुकलीची कामगिरी

 देशातील सर्वांत लहान वेटलिप्टर, पुण्यातल्या ६ वर्षांच्या चिमुकलीची कामगिरी

पुणे, दि. १५ : पुण्याची अवघी सहा वर्षांची मिहिरा गांगुर्डे हीने भारतातील सर्वात तरुण वेटलिफ्टर होण्याचा मान मिळवला आहे. स्वतःच्या शरीरापेक्षा अधिक वजन उचलत क्रीडा क्षेत्रात तिने नवा इतिहास रचला आहे. मिहिरा रोज नियमितपणे वॉर्मअप, रनिंग, जंपिंग आणि व्यायाम करते. मला हा खेळ खूप आवडतो. मी रोज एक्सरसाईज करते. पुढे जाऊन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे, असे ती आत्मविश्वासाने सांगते. विशेष म्हणजे, मिहिराला सर्वांचा आवडता अभिनेता अक्षय कुमार याला भेटण्याची संधीही मिळाली असून, त्यामुळे तिचा उत्साह आणखी वाढला आहे.

मिहिराचे कोच दुबे म्हणाले, आम्ही पाच वर्षांच्या मुलांसाठी फन अँड फिटनेसचे प्रशिक्षण देतो. त्यातून स्पीड, स्ट्रेंथ आणि स्टॅमिना तयार केला जातो. ज्यांच्याकडे अधिक स्पीड आणि ताकद असते, त्यांना योग्य खेळासाठी मार्गदर्शन केले जाते. मिहिराला गेल्या एका वर्षापासून वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण देत आहोत. तिने खासदार चषक, झेडपी स्पर्धा आणि देसाई कॉलेज येथे आयोजित स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *