कच्छमध्ये अदानी समूह करणार 1.5 लाख कोटींची गुंतवणूकीतून

 कच्छमध्ये अदानी समूह करणार 1.5 लाख कोटींची गुंतवणूकीतून

अहमदाबाद, दि. १३ : व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेत’ (VGRC) समूहाचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी कच्छ प्रदेशासाठी भव्य गुंतवणुकीची घोषणा केली. ही गुंतवणूक प्रामुख्याने बंदर विकास, अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी केली जाणार आहे. पुढील 5 वर्षांत कच्छच्या सर्वांगीण विकासासाठी ही मोठी रक्कम खर्च केली जाईल. जगातील महत्त्वाच्या बंदरांपैकी एक असलेल्या मुंद्रा पोर्टची क्षमता पुढील 10 वर्षांत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारत 8% दराने वाढत असून, गुजरात त्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात कच्छचे योगदान मोलाचे ठरेल.

करण अदानी यांनी नमूद केले की, भारताच्या औद्योगिक उत्पादनात गुजरातचा 17% वाटा आहे. देशातील एकूण मालवाहतुकीपैकी 40% वाहतूक एकट्या गुजरातच्या बंदरांमधून होते. एकेकाळी दुर्गम मानला जाणारा कच्छ भाग आता भारताचा लॉजिस्टिक आणि ऊर्जा केंद्र (Hub) बनला आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *