डिजिटल युगातील वैचारिक कट्टरता: कारणे आणि परिणाम

 डिजिटल युगातील वैचारिक कट्टरता: कारणे आणि परिणाम

जितेश सावंत

आजच्या डिजिटल युगात वैचारिक चर्चांमधून तर्क आणि माणुसकी हरवत चालली आहे. सुशिक्षित लोकही पुराव्यांकडे दुर्लक्ष करून आंधळेपणाने विशिष्ट विचारांच्या आहारी जात आहेत. ही केवळ राजकीय किंवा सामाजिक निष्ठा नसून, एक खोलवर चाललेले मानसशास्त्रीय युद्ध आहे.

ही प्रक्रिया इतकी सूक्ष्म असते की, आपण कोणाच्या तरी हातातील बाहुले बनलो आहोत, याची पुसटशी कल्पनाही आपल्याला येत नाही. पूर्वी युद्धे रणांगणावर लढली जायची, पण आता ती

माणसाच्या ‘मेंदूमध्ये’ लढली जात आहेत. तुमची आवड-निवड, तुमचा राग आणि तुमची मते हे सर्व ‘अल्गोरिदम’च्या मदतीने नियंत्रित केले जात आहेत. तुम्ही खरोखर स्वतंत्र विचार करत आहात की तुम्हाला तसा भास करून दिला जातोय? विवेकाचा हा प्रवास आंधळ्या कट्टरतेकडे कसा होतो, हे समजून घेण्यासाठी खालील ५ मानसशास्त्रीय पैलू समजून घेणे गरजेचे आहे:

१. अल्गोरिदमचा सापळा: तुमच्या आवडीचे डिजिटल कुंपण
सोशल मीडियाची यंत्रणा (अल्गोरिदम) एका हुशार सेल्समनसारखी असते. तुम्ही कोणत्या पोस्ट लाईक करता, कोणते व्हिडिओ जास्त वेळ पाहता, याचा ती सतत अभ्यास करत असते. तुम्ही ज्या

विचारधारेच्या बाजूने असता, ही यंत्रणा तुम्हाला तसाच मजकूर वारंवार दाखवते. यालाच सोप्या भाषेत ‘इको चेंबर’ (Echo Chamber) म्हणतात. याचा अर्थ असा की, तुम्ही एका अशा खोलीत बंद आहात जिथे तुम्हाला फक्त स्वतःचाच आवाज (किंवा स्वतःला आवडणारेच विचार) प्रतिध्वनीच्या रूपाने ऐकू येतात. यामुळे तुम्हाला वाटते की संपूर्ण जग तुमच्यासारखाच विचार करत आहे आणि तुमच्या विरोधात मांडले जाणारे वास्तव तुमच्यापर्यंत पोहोचूच दिले जात नाही.

२. विचारधारेचा आंधळा अभिमान (Tribalism)
माणूस जेव्हा स्वतःला एका विशिष्ट विचारधारेचा भाग मानतो, तेव्हा त्याची वैयक्तिक विवेकबुद्धी गहाण पडते. यालाच ‘ट्रायबलिझम’
(Tribalism) किंवा आधुनिक ‘टोळीवाद’ म्हणतात. तो स्वतःच्या बुद्धीऐवजी समूहाची ‘ग्रुप थिंकिंग’

(Group Think) वापरू लागतो. समूहाचा भाग राहण्याच्या नादात समोरच्या व्यक्तीला ‘माणूस’ न मानता केवळ ‘विरोधक’ म्हणून हिणवण्याची विखारी प्रवृत्ती वाढते.

३. खोटं जेव्हा खरं वाटतं (Illusory Truth Effect)
एखादे खोटे विधान जर वारंवार कानावर पडले किंवा सोशल मीडिया फीडवर आले, तर मानवी मेंदूला तेच सत्य वाटू लागते. यालाच

8

मानसशास्त्रात ‘इल्यूजनरी ट्रुथ इफेक्ट’ (Illusory Truth Effect) म्हणतात. ‘प्रोपोगंडा’च्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या माहितीला सुशिक्षित लोकही बळी पडतात, कारण ती माहिती त्यांच्या विचारधारेला सुखावणारी असते. ‘खोटं पण आपल्या हिताचं’ ही वृत्ती सत्याचा बळी घेते.

४. डिजिटल पुरावा: सुरक्षिततेचा भ्रम आणि तांत्रिक वास्तव
आज सोशल मीडियावर अनेक सुशिक्षित लोक आक्रमक भाषेत बोलतात. स्क्रीनमुळे आपल्याला एक प्रकारची ‘सुरक्षिततेची खोटी भावना’ (Sense of Impunity) मिळते. समोरचा माणूस प्रत्यक्ष

समोर नसल्यामुळे आणि आपल्याला मिळणाऱ्या ‘लाईक्स’ची गर्दी सोबत असल्यामुळे, आपण काहीही बोललो तरी चालतं असा भ्रम निर्माण होतो.

पण एक डिजिटल एव्हिडन्स स्पेशालिस्ट म्हणून मी इशारा देऊ इच्छितो की, उत्साहाच्या भरात केलेली एखादी आक्षेपार्ह कमेंट किंवा दिलेली शिवी हा कायमस्वरूपी ‘डिजिटल फुटप्रिंट’ (Digital Footprint) असतो. अनेकांना वाटते की नाव किंवा फोटो लपवून (Anonymity) आपण सुरक्षित आहोत, पण हा एक मोठा तांत्रिक भ्रम आहे. तुम्ही तुमची बाह्य ओळख लपवली तरी तुमच्या आयपी ॲड्रेस (IP Address) आणि डिव्हाईस आयडी (Device ID) मुळे यंत्रणा तुमच्यापर्यंत सहज पोहोचू शकते. डिजिटल विश्वात तुमचा प्रत्येक ‘क्लिक’ हा पुराव्याच्या स्वरूपात जतन होतोय, जो भविष्यात नोकरी, पासपोर्ट किंवा कायदेशीर व्हेरिफिकेशनच्या वेळी तुमच्या प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो.

५. ‘कोर्टिसोल’चा विळखा आणि तुटलेली नाती
सततचा द्वेष आणि ऑनलाइन वादावादीमुळे शरीरात ‘कोर्टिसोल’ (Cortisol) सारख्या स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण वाढते. याचा परिणाम केवळ वाढत्या रक्तदाबात होत नाही, तर तो तुमच्या

S

स्वभावात कायमचा कडवटपणा आणतो. केवळ वैचारिक मताभेदांमुळे रक्ताची नाती किंवा वर्षानुवर्षांची मैत्री तुटणे, हे या युगातील सर्वात मोठे सामाजिक अपयश आहे.

सत्ता आणि विचारधारा बदलत राहतात, पण तुम्ही दिलेला शिव्याशाप आणि मनातील द्वेष तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा कायमस्वरूपी भाग बनतो. आपली बुद्धी दुसऱ्याच्या रिमोट कंट्रोलवर चालवणे ही आधुनिक ‘मानसिक गुलामगिरी’ आहे. ज्यांच्यासाठी तुम्ही ‘ऑनलाइन युद्ध’ लढताय, ते नेते मात्र पडद्यामागे उत्तम मित्र असतात. मग तुम्ही तुमचा विवेक का गहाण टाकताय?

वेळ आली आहे, विचारधारेचा अंधचश्मा काढून ‘माणूस’ म्हणून वास्तवाकडे पाहण्याची!

लेखक : सायबर कायदा ,डेटा प्रोटेक्शन कायदा व मानसशास्त्र अभ्यासक आहेत

संपर्क: jiteshsawant33@gmail.com

ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *